
पुणे: शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने (AHTU) नवले पूल परिसरातील लॉजवर धडक कारवाई करत देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. कात्रज-आंबेगाव रस्त्यावरील ‘साई किरण’ आणि ‘गॅलेक्सी’ लॉजवर टाकलेल्या या छाप्यात ०९ पीडित महिलांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
बनावट गिऱ्हाईक पाठवून खात्री, अन् टाकली धाड
आंबेगाव बुद्रुक येथील बर्गर किंगजवळील लॉजमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक आशलता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आधी बनावट गिऱ्हाईक (Punter) पाठवून बातमीची शहानिशा केली.
व्यवसाय सुरू असल्याचे निश्चित होताच पथकाने २० जुलै २०२६ रोजी साई किरण आणि गॅलेक्सी लॉजवर अचानक छापा टाकला. या कारवाईत लॉजमध्ये आणलेल्या ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
- राकेश राजू पाटोळे (वय २७, व्यवसाय- रिक्षाचालक, रा. गणेश नगर, धायरी, पुणे)
- मंगेश व्यंकट बनसोडे (व्यवसाय- लॉज मॅनेजर, रा. गॅलेक्सी लॉज, आंबेगाव, मूळ रा. खेड, ता. लोहारा, जि. धाराशिव)

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…