July 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुण्यात गुन्हे शाखेची धडक कारवाई; कात्रज येथून ‘मोका’ प्रकरणातील सराईत आरोपीला ठोकल्या बेड्या…

पुणे ( सुनित जैनजांगडे ): पुणे शहरातील गंभीर गुन्ह्यांतील फरार व सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्याच्या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट २ ने अत्यंत कौशल्याने मोठी कामगिरी बजावली आहे. राजगड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ‘खुनाचा प्रयत्न’ (Attempt to Murder) प्रकरणातील फरार आरोपी आणि ‘मोका’ (MCOCA) कायद्यान्वये जेलमधून रिलीज झालेल्या सराईत गुन्हेगाराला कात्रजच्या सच्चाई मातानगर येथून जेरबंद करण्यात आले आहे.

महेश तानाजी घोगरे (वय ३२ वर्षे, रा. साईबाबा मंदिरा/जैन मंदिरा जवळ, कात्रज, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

गोपनीय बातमीदाराच्या खबरीवरून सापळा

​दिनांक २१ जुलै २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट २ च्या हद्दीत गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. या दरम्यान पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, विजय पवार, सर्जेराव सरगर आणि शंकर कुंभार यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली की, राजगड पोलीस ठाण्यातील खुनाचा प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी सच्चाई मातानगर, कात्रज येथे थांबलेला आहे.

​या बातमीची शहानिशा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सच्चाई मातानगर परिसरात तत्काळ जाऊन सापळा रचला आणि संशयित आरोपी महेश घोगरे याला ताब्यात घेतले.

‘मोका’ प्रकरणातील सराईत गुन्हेगार

​ताब्यात घेतलेल्या महेश घोगरे याच्याबाबत राजगड पोलीस ठाणे (पुणे ग्रामीण) येथे विचारपूस केली असता, तो राजगड पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ४४६/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ११८/२, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अंतर्गत दाखल गुन्ह्यात पाहिजे असलेला फरार आरोपी असल्याचे स्पष्ट झाले.

​आरोपी महेश घोगरे हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी ‘मोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई झालेली आहे आणि तो जेलमधून सुटलेला होता. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक

​ही कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांच्या सूचनेनुसार पार पडली.

​या कारवाईत पोलीस उप-निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विजय पवार, सर्जेराव सरगर, शंकर नेवसे, नागनाथ राख, साधना ताम्हाणे, योगेश मांढरे, संतोष टकले, शिवानंद कायगुडे, महेश मंडलिक, विनोद चव्हाण, संजय आबनावे, ओमकार कुंभार, आशिष यादव, सद्दाम तांबोळी आणि विनायक वगारे यांनी सहभाग घेतला.

Spread the love