
पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास बुलेट आणि इतर मोटारसायकलचे कर्णकर्कश ‘फटाका सायलेन्सर’ वाजवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या ५ तरुणांवर विश्रांतवाडी पोलिसांनी कठोर कायदेशीर कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४ मोटारसायकल जप्त केल्या असून त्यांचे फटाका सायलेन्सर काढून नष्ट करण्यात आले आहेत.
नेमकी घटना काय?
दिनांक ३१ जुलै २०२६ रोजी रात्री २.०० ते २.३० दरम्यान धानोरी येथील सुमा रिगालीया सोसायटी परिसरात काही तरुण बुलेट आणि इतर मोटारसायकलींचे सायलेन्सर फटाक्यासारखे मोठ्या आवाजात वाजवत होते. धोकादायक पद्धतीने गाड्या चालवून परिसरात भीतीदायक व दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले होते, ज्याचे रिल्स सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते. याप्रकरणी परिसरातील नागरिकांनी रात्रीच पोलीस ठाण्यात फोन करून धास्तावल्याची तक्रार दिली होती.
पोलिसांची धडक कारवाई आणि गुन्हा दाखल
नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने आणि बीट मार्शलने गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळवली. फटाका सायलेन्सर वाजवून दहशत पसरवणाऱ्या २ बुलेट, १ केटीएम आणि १ स्प्लेंडर मोटारसायकलींचा व त्यावरील चालकांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
या सर्व आरोपींविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, २९२ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १८२ (अ), १९४ (एफ), १९८, १९९ (१९७) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी:
१. आशिष अशोक शिंदे (वय २१, रा. निंबाळकरनगर, लोहगाव, पुणे)
२. गुरुपितसिंग कर्नलसिंग कंबोज (वय २१, रा. निंबाळकरनगर, लोहगाव, पुणे)
३. संजय मुकेश सरवदे (वय २०, रा. भिमनगर, विश्रांतवाडी, पुणे)
४. गौरव लक्ष्मण मस्के (वय २०, रा. मस्केवस्ती, विश्रांतवाडी, पुणे)
५. एक विधीसंघर्षित बालक
जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचा तपशील:
पोलिसांनी हुल्लडबाजांच्या एकूण ४ मोटारसायकल (अंदाजे किंमत ५,७५,०००/- रुपये) जप्त केल्या आहेत:
- बुलेट (क्र. MH 14 JQ 2169)
- बुलेट (क्र. MH 14 FU 9200)
- केटीएम मोटारसायकल (क्र. FH 12 YC 0146)
- स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH 12 YM 6370)
जप्त केलेल्या मोटारसायकलींचे कर्णकर्कश फटाका सायलेन्सर जागेवरच काढून नष्ट करण्यात आले आहेत.
मार्गदर्शक व तपास पथक
सदरची धडक कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
- मार्गदर्शन: अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ ४) चिलूमुला रजनिकांत, सहाय्यक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) सुनिल जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर कदम.
- तपास पथक: सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल उगले तसेच पोलीस अंमलदार बबन वणवे, कृष्णा माचरे, यशवंत किर्वे, संपत भोसले, विशाल गाडे, वामन सावंत, संजय बादरे, धवल लोणकर, स्वप्नील कांबळे, किशोर भुसारे, होना साबळे आणि प्रमोद जाधव यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…