September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे गुन्हे शाखा युनिट २ ची मोठी कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील २ आरोपी आणि २ विधीसंघर्षित बालके जेरबंद…

पुणे: पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या दोन पाहिजे आरोपींना आणि दोन विधीसंघर्षित बालकांना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले आहे. दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ रोजी ही धडक कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणातील आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पर्वती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

​घटनेची पार्श्वभूमी व कारवाईचा तपशील

​पर्वती पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), ११५(२), १८९(२), १९१(२), १९० नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपींचा शोध गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार घेत होते.

​तपासादरम्यान पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, शिवानंद कायगुडे, महेश मंडलिक व संदीप शिर्के यांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी हे हिंगणे चौक (सिंहगड रोड) आणि पद्मावती भागात फिरत आहेत.

​ही माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे यांनी तात्काळ पथकाला घटनास्थळी जाऊन पाहणी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेशाचे पालन करत युनिट २ च्या पथकाने सापळा रचून कारवाई केली.

​ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे:

​१. सुजित सोमनाथ धुतावळे (वय १९ वर्षे, रा. समर्थनगर, हिंगणे खुर्द, पुणे) – हिंगणे चौक, सिंहगड रोड येथून ताब्यात.

२. आशिष राजू सोनवणे (वय १९ वर्षे, रा. समर्थनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड, पुणे) – हिंगणे चौक, सिंहगड रोड येथून ताब्यात.

३. दोन विधीसंघर्षित बालके – पद्मावती, पुणे येथून ताब्यात.

​या सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईकामी पर्वती पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

​पोलिसांची यशस्वी कामगिरी

​सदरची महत्त्वाची कामगिरी खालील अधिकाऱ्यांच्या ಮಾರ್गदर्शनाखाली पार पडली:

  • मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे): श्रीमती तेजस्वी सातुपते
  • मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे): श्री. गौहर हसन
  • मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे): श्री. शैलेश संखे
  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा युनिट २): श्री. राहुल खिलारे

पोलीस पथक:

पोउपनि ज्ञानेश्वर दळवी, तसेच पोलीस अंमलदार शिवानंद कायगुडे, उज्वल मोकाशी, महेश मंडलिक, संदीप शिर्के, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, नागनाथ राख, कुंदन शिंदे, आशिष यादव, संजय आबनावे, शंकर कुंभार, विजय पवार, साधना ताम्हाणे, योगेश मांढरे, विद्या शिंदे, सदाम तांबोळी व विनायक वगारे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Spread the love

You may have missed