
पुणे: आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालात असताना आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्याला आळा घातला आहे. जांभुळवाडी परिसरात सापळा रचून पोलिसांनी ३ गावठी अग्निशस्त्रे (कट्टे) आणि १ जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तीन सराईत आरोपींना शिताफीने अटक केली आहे.
घटनेची पार्श्वभूमी व कारवाई
दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी आंबेगाव पोलीस स्टेशनकडील अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, धनाजी धोजे, सचिन गाडे आणि सुभाष मोरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जांभुळवाडी पाझरतलावाच्या शेजारील मोकळ्या जागेत (जांभुळवाडी रोड, शनिनगर, आंबेगाव खुर्द, पुणे) तीन इसम संशयितरीत्या थांबले असून त्यांच्याकडे अग्निशस्त्र आहेत.
या प्राप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश नायकवडी, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे आणि पथकाने तात्काळ संबंधित ठिकाणी सापळा रचला. या कारवाईत पोलिसांनी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
- राजन विनोद शहा (वय २३ वर्षे, रा. पोकळे क्रिस्टल सोसायटी, काळभैरवनाथ मंदिरासमोर, धायरीगाव, पुणे)
- अनिल कैलास चौधरी (वय २६ वर्षे, रा. संदेश रेसिडन्सी, धायरीगाव, पुणे)
- प्रथम अरूण रेणुसे (वय २४ वर्षे, रा. जाधव हाईटस, भैरवनाथ मंदिराच्या मागे, नाईक आळी, धायरीगाव, पुणे)
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व गुन्हा दाखल
पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे १,२०,५००/- रुपये किमतीचे ०३ गावठी कट्टे (अग्निशस्त्र) आणि ०१ जिवंत काडतूस हस्तगत केले आहे.
या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गु.र.नं. ३४१/२०२६, आर्म्स अॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(२)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस पथकाचे मार्गदर्शन व सहभाग
सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-२) मिलिंद मोहिते आणि सहायक पोलीस आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली; आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने व पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे यांच्या सूचनांनुसार पार पाडली.
या यशस्वी कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक महेश नायकवडी, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे, तसेच पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, आकाश फासगे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, सुभाष मोरे, अजय कामठे, ज्ञानेश्वर चित्ते, शिवाजी पोटोळे, योगेश जगदाळे, राकेश टेकावडे आणि फिरोज शेख यांच्या पथकाने सहभाग घेतला.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…