
पुणे (प्रतिनिधी : रोहन काशीद): पुणे शहरात वाहन तोडफोड करून दहशत माजवणारे आणि गुन्ह्यापासून फरार असलेले दोन पाहिजे आरोपींना गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. सिंहगड रोड परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून, आरोपींवविरोधात पर्वती पोलीस ठाण्यात विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे शहरात पाहिजे व फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार, १२ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, महेश मंडलिक आणि संदिप शिर्के यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पर्वती पोलीस ठाण्याच्या गु.र.नं. १८६/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३२४(४), १८९(१), १९०, १९१(२), १९१(३), आर्म अॅक्ट ४(२५), म.पो.अ. ३७(१)(३) सह १३५) मधील वाहन तोडफोडीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी सिंहगड रोड परिसरात येणार आहेत.
ही माहिती मिळताच युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना अवगत करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर कारवाईचे आदेश घेण्यात आले.
आरोपींची नावे:
पोलीस पथकाने सापळा रचून खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले:
१. नितिन रमेश उदगिरे (वय २५ वर्षे, रा. पद्मावती, पुणे)
२. अनुकित सुरेंद्र गायकवाड (वय ३० वर्षे, रा. भन्साळी कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, पुणे)
ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पर्वती पोलीस ठाण्याच्या हजर करण्यात आले आहे.
पोलीस पथकाची कामगिरी:
सदर धडक कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन, आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश गाने, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी तसेच पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, महेश मंडलिक, संदिप शिर्के, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, नागानाथ राख, सर्जेराव सरगर, विजयकुमार पवार, साधना ताम्हाणे, विदया शिंदे, आशिष यादव, शंकर कुंभार, योगेश मांढरे, ओंकार कुंभार, शिवानंद कायगुडे आणि विनायक वगारे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…