September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे: कोथरुड पोलिसांची मोठी कारवाई! मोक्का गुन्ह्यातील १ वर्षापासून फरार असलेले दोन सराईत आरोपी जेरबंद…

पुणे (प्रतिनिधी: अमित मुंडिक): पुणे शहर पोलीस दलाच्या कोथरुड पोलीस स्टेशनच्या पथकाने धडक कारवाई करत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) आणि इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या एक वर्षापासून फरार असलेल्या दोन मोक्याच्या वॉण्टेड आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. संतोष अनंत धुमाळ आणि विपुल उत्तम माझिरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्ह्याची पार्श्वभूमी:

​कोथरुड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २३९/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(४), ३५१(३), ३५२.३(५) सह आर्म अॅक्ट कलम ३(२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ३, ७ तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (MCOCA) कलम ३(१)(२), ३(४) नुसार गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यातील पाहिजे असलेला मुख्य आरोपी संतोष धुमाळ हा गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता.

अशी केली कारवाई:

  • पहिल्या आरोपीची गुलमोहर सोसायटीतून धरपकड: पोलीस हवालदार लांडगे यांना गुप्त बातमी मिळाली की, फरार आरोपी संतोष धुमाळ हा त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी कोथरुड गावठाण येथील गुलमोहर सोसायटीत येणार आहे. ही माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अवगत केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुलमोहर सोसायटीच्या आत व बाहेर जाण्याच्या मार्गावर तसेच लिफ्टजवळ सापळा रचला. सोसायटीमधील फ्लॅटची तपासणी करत असताना संतोष धुमाळ एका फ्लॅटमधून खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस पथकाने त्याला अत्यंत शिताफिने जागीच ताब्यात घेतले.
  • दुसऱ्या आरोपीला बालगंधर्व चौकातून बेड्या: तपासणीदरम्यान आरोपी संतोष धुमाळकडे कसून चौकशी केली असता, त्याने दुसरा पाहिजे असलेला आरोपी विपुल उत्तम माझिरे (वय ३० वर्षे, रा. रावडे, ता. मुळशी, जि. पुणे) हा त्यास भेटण्यासाठी बालगंधर्व चौकातील जोशी वडेवाले यांच्या दुकानामागे येणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ बालगंधर्व चौकात सापळा रचून विपुल माझिरे यासही जेरबंद केले. दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कोथरुड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मार्गदर्शन आणि यशस्वी पोलीस पथक:

​सदरची उत्कृष्ट कामगिरी खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

  • मार्गदर्शक: श्री. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त), श्री. संजय दराडे (सह पोलीस आयुक्त), श्री. राजेश बनसोडे (अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग), डॉ. सागर कवडे (पोलीस उपायुक्त, परिमंडळ-३), श्रीमती सुजाता तानवडे (सहायक पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग).
  • कारवाई करणारे पथक: श्री. अरुण घोडके (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), श्री. अनिल माने व श्री. सुनील कारोटे (पोलीस निरीक्षक – गुन्हे), सुधीर घुले (सहायक पोलीस निरीक्षक) तसेच पोलीस अंमलदार लांडगे, पठाण, सोनावणे, दगडे, लोखंडे, पांढरे, शिर्के, डोंगरे आणि जमदाडे यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

Spread the love

You may have missed