September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

दोन वर्षांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक; दोन गुन्हे उघडकीस…

पुणे : पुणे शहरातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखेने अटक केली आहे. आकाश उर्फ बाळ्या नरहरी शिंदे (वय २८, रा. जाधवनगर, रायकरमळा, धायरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून दोन गुन्ह्यांची माहिती समोर आली आहे.

दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ मधील अधिकारी व कर्मचारी पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेत होते. यावेळी पोलीस अंमलदार रविंद्र लोखंडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आकाश शिंदे हा रायकरमळा येथील मारुती मंदिराजवळ थांबलेला असल्याची माहिती मिळाली.

माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार पथकाने सायंकाळी सुमारे ५ वाजता रायकरमळा येथील मारुती मंदिराजवळ कारवाई करत आकाश उर्फ बाळ्या शिंदे याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने खडक पोलीस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. ९६/२०२४, भारतीय दंड विधान कलम ३९२, ३४ अन्वये दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात इतर साथीदारांसह सहभाग असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच बावधन पोलीस ठाण्यातील गुन्हा रजि. नं. २१७/२०२५, बीएनएस कलम ३१८(२), ३(५) अन्वये दाखल असलेल्या आणखी एका गुन्ह्याची माहितीही तपासात समोर आली आहे.

आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ चे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे यांच्यासह रविंद्र लोखंडे, अजित शिंदे, प्रदीप राठोड, बाळू गायकवाड, साई कारके, अमित गद्रे, महेश पाटील, नारायण बनकर, महिला पोलीस अंमलदार साधना पवार व विद्या प-हाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Spread the love

You may have missed