
पुणे, लोणी काळभोर (प्रतिनिधी: विशाल सानप): मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर मानसिकदृष्ट्या खचलेल्या एका वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज (२९ ऑगस्ट) सकाळी लोणी काळभोर परिसरात घडली. गुरुषणतप्प सिद्धांप्पा मठ (वय ४७) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुषणतप्पा मठ यांचा मुलगा सोमेश्वर मठ याचा सुमारे दोन वर्षांपूर्वी अपघात झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूचा धक्का तसेच स्वतः अपंगत्वामुळे गुरुषणतप्पा मठ मानसिकदृष्ट्या खचले होते, अशी माहिती समोर आली आहे.
आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी आपल्या ड्राय क्लिनिंगच्या दुकानातील आराम खोलीत गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच त्यांचा मुलगा आकाश मठ यांनी त्यांना तातडीने लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भापकर आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक देवकर करीत आहेत.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…