October 27, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

उरुळी कांचन पोलिसांची कामगिरी; १०.५१ लाखांचे ३८ गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना परत…

उरुळी कांचन : एप्रिल २०२६ ते सप्टेंबर २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत गहाळ झालेले तब्बल ३८ मोबाईल फोन उरुळी कांचन पोलिसांच्या सायबर विभागाने शोधून काढले आहेत. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १० लाख ५१ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.४५ ते ११.४५ वाजण्याच्या दरम्यान उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात शोधून काढलेले मोबाईल संबंधित नागरिकांना दौंड विभागाचे पोलीस उपअधीक्षक बापूराव दडस यांच्या हस्ते परत करण्यात आले.

ही कामगिरी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई प्रदीप शिवाजी बालगुडे (ब. नं. १३३८) यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

पोलीस शिपाई प्रदीप बालगुडे यांनी भारतीय सैन्य दलात १७ वर्षे सेवा बजावली असून, मागील चार वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या ते उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या सायबर विभाग तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेत कर्तव्य बजावत आहेत.

गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्यानंतर संबंधित नागरिकांनी उरुळी कांचन पोलीस ठाणे तसेच पोलीस शिपाई प्रदीप बालगुडे यांचे आभार मानले.

Spread the love