October 25, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची १०९वी सर्वसाधारण सभा संपन्न…

Oplus_16908288

पुणे : लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची १०९वी सर्वसाधारण सभा आज, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी साधना सहकारी बँकेचे माजी चेअरमन सुभाष नर्सिंग काळभोर उपस्थित होते. संस्थेचे सचिव तानाजी शिवाजी देवकुळे तसेच सहसचिव पूजा नीलेश गुजर यांनी संस्थेचा वार्षिक लेखाजोखा सभेसमोर मांडला. यावेळी उपस्थित सभासदांनी विविध विषयांवर चर्चा करून सभेतील ठरावांना मंजुरी दिली.

संस्थेच्या एकूण ३३०५ सभासदांपैकी १४९ सभासद थकबाकीदार असून, त्यापैकी ६१ सभासदांची एकूण ४९ लाख ३५ हजार रुपयांची कर्जमाफी शासनाकडून करण्यात आली आहे, अशी माहिती सभेत देण्यात आली.

संस्थेचे भागभांडवल ८३ लाख रुपये, बँक कर्ज ४ कोटी ६ लाख रुपये, सभासद कर्ज ३ कोटी ३० लाख रुपये, गुंतवणूक ४२ लाख रुपये, राखीव निधी ५५ लाख रुपये, तर थकबाकी २ कोटी ८४ लाख रुपये असल्याचे सभेत सांगण्यात आले. संस्थेला चालू वर्षात १५ लाख रुपयांचा तोटा, तर संचित तोटा ७२ लाख रुपये असल्याची माहितीही देण्यात आली. संस्थेचे लेखापरीक्षण ‘ब’ वर्गात झाले आहे.

सभेला सोसायटीचे चेअरमन रमेश यशवंत भोसले, व्हाईस चेअरमन सौ. राजश्री उदय काळभोर, गुरुदेव आबा काळभोर, बाळासाहेब जयवंत काळभोर, हेमंत गंगाराम गायकवाड, संजय लक्ष्‍मण काळभोर, सागर बाळासो काळभोर, सचिन मुरलीधर काळभोर, बाळासाहेब पर्वतराव काळभोर, अमोल सिदु कोळपे, सौ. वर्षा मयूर काळभोर, सचिन सुभाष काळभोर, दत्तात्रेय नरसिंग काळभोर, संतोष भोसले, सरपंच नागेश काळभोर, राजू आबा काळभोर, सुभाष काशिनाथ काळभोर, ज्ञानेश्वर नारायण काळभोर, विठ्ठल रामचंद्र काळभोर, सूर्यकांत काळभोर, निलेश शिवाजी काळभोर, युवराज विलास काळभोर, सतीश काळभोर, बाजीराव बबन काळभोर, यांच्यासह सभासद व मान्यवर उपस्थित होते.

सभेचे सूत्रसंचालन संजय मामा भालेराव यांनी केले. तर संस्थेचे माजी चेअरमन राहुल दत्तात्रय काळभोर यांनी उपस्थित शेतकरी सभासद व मान्यवरांचे आभार मानले. त्यानंतर सभेची सांगता करण्यात आली.

Spread the love