October 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

नागपुरात ड्राय डेआधी अवैध दारू वाहतूक; स्कॉर्पिओसह 11.20 लाखांचा मुद्देमाल जप्त…

नागपूर (प्रतिनिधी: प्रकाश वाघमारे) : 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त ड्राय डे असण्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात अवैध दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी कारवाई केली. क्राईम ब्रँच युनिट-1 ने हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत स्कॉर्पिओ वाहनातून मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी दारू जप्त केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर रोजी रात्री वर्धा-नागपूर महामार्गावर डोंगरगाव येथील सोल रूफ टॉप हॉटेलसमोर ही कारवाई करण्यात आली. यावेळी योगेश आकोडे याला विनापरवाना दारूची वाहतूक करताना पोलिसांनी ताब्यात घेतले.

तपासणीदरम्यान स्कॉर्पिओ वाहनातून देशी दारूच्या सुमारे 1,000 बाटल्यांसह रॉयल चॅलेंज, मॅजिक मूव्हमेंट आणि रॉयल स्टॅग या ब्रँडची विदेशी दारू जप्त करण्यात आली.

या कारवाईत दारूसाठा, सुमारे 10 लाख रुपये किमतीचे स्कॉर्पिओ वाहन आणि मोबाईल असा एकूण 11 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Spread the love