
दौंड, यवत (प्रतिनिधी: प्रीतम सावंत): नांदूर (ता. दौंड) येथे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या रसायनासह साहित्यावर यवत पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 77 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नांदूर गावच्या हद्दीत पवार रिसॉर्टसमोरील ओढ्याच्या कडेला ही कारवाई करण्यात आली. अमित दुला गुडदावत (वय 30, रा. खामगाव गाडामोडी, ता. दौंड) हा गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी कच्चे रसायन व साहित्य बाळगताना आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारवाईदरम्यान दोन मोठे लोखंडी बॅरलमध्ये प्रत्येकी सुमारे 1000 लिटर, असे एकूण 2000 लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायन, तसेच अॅल्युमिनियमची थाळी, अॅल्युमिनियमचा चाटू आणि दोन मन लाकडी सरपण असा एकूण 77,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 848/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 123 तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 मधील कलम 65 (ख), (ग), (च) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोहवा/1803 मोहिते करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोहवा/653 कदम यांनी केली. फिर्याद स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार गुरूनाथ युवराज गायकवाड यांनी दिली आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…