
पुणे (सुनित जैनजांगडे):पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत संघटित गुन्हेगारी आणि गंभीर गुन्ह्यांमधील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत दोन गंभीर ‘मोक्का’ (MCOCA) गुन्ह्यांत वर्षभरापासून पाहिजे असलेल्या एका सराईत फरार आरोपीला कोथरुड परिसरातून अटक केली आहे.
पंकज सुरेश वांभिरे (वय २४ वर्षे, रा. गुजरात कॉलनी, कोथरुड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे घरातून ठोकल्या बेड्या
अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वीनी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) श्री. शैलेश संखे यांनी गंभीर व मोक्का गुन्ह्यांमधील फरार आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे आणिण्याचे पथक कार्यक्षेत्रात शोध घेत होते.
या दरम्यान, पथकातील पोलीस अंमलदार अतुल साठे आणि संदिप शेळके यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, मोक्का गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी पंकज वांभिरे हा कोथरुडमधील गुजरात कॉलनी येथील त्याच्या राहत्या घरी आला आहे. अंमलदारांनी ही माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांना दिली. त्यांनी दिलेल्या कायदेशीर कारवाईच्या सुचनेनुसार, पथकाने १८ जुलै २०२६ रोजी आरोपीच्या घरावर छापा टाकून त्याला घरातूनच शिताफीने ताब्यात घेतले.
कोथरुडमधील दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये होता सामील
अटक केल्यानंतर आरोपीला पोलीस निरीक्षक युनिट ३ यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याचा कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गंभीर गुन्ह्यांमध्ये थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
१) कोथरुड पोलीस ठाणे गु.र.नं. २५०/२०२५: भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ३५२, ३५१, १८९(१), १८९(४), १९१(२), १९०, १११(२), ६१(२), ४९, ३(५) सह आर्म ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि मोक्का (MCOCA) कलम ३(१)(II), ३(२), ३(४), ३(५), ४ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल आहे.
२) कोथरुड पोलीस ठाणे गु.र.नं. २५१/२०२५: भारतीय न्याय संहिता (BNS) सह आर्म ॲक्ट, क्रिमिनल लॉ ॲक्ट आणि मोक्का (MCOCA) कलम ३(१)(II), ३(२), ३(४) अन्वये गुन्हा दाखल आहे.
पुढील कायदेशीर तपासासाठी आरोपीला सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या पथकाने केली कामगिरी
सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक श्री. प्रशांत अन्नछत्रे यांच्या सुचनेनुसार पोलीस अंमलदार साठे, शेळके, तारु, तुपसौंदर, बोडरे, गायकवाड, चंदनशिवे तसेच महिला पोलीस अंमलदार वाघमारे आणि जगदाळे यांच्या पथकाने केली आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…