
पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली झोन-७ मध्ये सुरू असलेल्या “मिशन क्रॅकडाऊन” या विशेष मोहिमेअंतर्गत अवैध धंद्यांविरुद्धची कारवाई तीव्र करण्यात आली आहे. बेकायदेशीर व्यवसाय, अमली पदार्थ, प्रतिबंधित गुटखा, जुगार आणि अवैध शस्त्रांविरुद्ध सुरू असलेल्या या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी (१६ जुलै २०२६) पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठे छापे टाकले. या मोहिमेचा मुख्य उद्देश केवळ किरकोळ आरोपींवर कारवाई न करता, बेकायदेशीर व्यवसायामागील मुख्य सूत्रधार, संचालक आणि आर्थिक लाभ घेणाऱ्या मुख्य व्यक्तींना गजाआड करणे हा आहे.
१) लोहगाव: साडेतीन लाखांपेक्षा जास्त किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त
लोहगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खेसे पार्क परिसरात पोलिसांनी एका संशयास्पद ऑटोरिक्षाची तपासणी केली. यावेळी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले.
- अटक केलेला आरोपी: हनुमंता शिवलिंगप्पा शिंदे (वय २२ वर्षे)
- जप्त मुद्देमाल: ₹२,४५,९८८/- किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आणि वाहतुकीसाठी वापरलेली ऑटोरिक्षा (किंमत ₹१,५०,०००/-).
- एकूण जप्त रक्कम: ₹३,९५,९८८/-
- कारवाई: आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२) खराडी: आयटी पार्क परिसराजवळील मटका जुगार अड्ड्यावर धाड, ११ जण ताब्यात
१६ जुलै रोजी दुपारी २:४५ वाजता झोन-७ च्या विशेष पथकाने खराडी येथील सेन्सार आयटी टॉवरसमोरील मोकळ्या मैदानात सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला. या कारवाईत ४ मटका रायटर्स आणि ७ ग्राहकांसह एकूण ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या व्यवसायाचा मुख्य चालक व संचालक बापू भगवान टेकाळे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी (मटका रायटर):
१. सज्जन पांडुरंग काळे (वय ४८ वर्षे)
२. शंकर नारायण चव्हाण (वय ५० वर्षे)
३. संजय वसंत सुस्वसे (वय ४५ वर्षे)
४. दीपक बाबुलाल बारास (वय ६८ वर्षे)
ताब्यात घेण्यात आलेले ग्राहक:
१. शंकर नारायण चव्हाण (वय ५० वर्षे), २. हनुमंत सदाशीव चांदीवाले (वय ६३ वर्षे), ३. नागदेव बळीराम टालवारे (वय ४४ वर्षे), ४. नवनाथ मधुकर हिले (वय ५० वर्षे), ५. गंगाधर वामनराव घोडके (वय ५० वर्षे), ६. संजय जोसेफ जाधव (वय ४५ वर्षे), ७. रामभाऊ आबासाहेब विकले (वय ४४ वर्षे).
- जप्त मुद्देमाल:
- रोख रक्कम: ₹५३,४३०/-
- कल्याण व पूना बाजार मटका पुस्तके आणि साहित्य
- २ ऑटोरिक्षा (किंमत ₹३,००,०००/-)
- १२ मोबाईल फोन (किंमत ₹४२,०००/-)
- एकूण जप्त रक्कम: ₹३,९५,४३०/-
- कारवाई: सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन:
झोन-७ च्या हद्दीत कुठेही गुटखा, मटका, जुगार, अमली पदार्थ किंवा अवैध शस्त्रे विक्री सुरू असल्यास नागरिकांनी निर्भयपणे 9922744599 किंवा 9922717999 या क्रमांकांवर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…