September 13, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

वाडी नगर परिषदेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; स्वरित वाघमारेचा विशेष सत्कार…

नागपूर, वाडी (प्रतिनिधी: प्रकाश वाघमारे) : वाडी नगर परिषदेच्या वतीने दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. वाडी शहराच्या नगरसेविका तथा नगर परिषद उपाध्यक्ष श्रीमती कल्पना सकदेव यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सीबीएसई आणि राज्य मंडळाच्या दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी दिल्ली पब्लिक स्कूल, लावा येथील विद्यार्थी स्वरित वाघमारे याचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वरितने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच विज्ञान आणि मराठी या दोन्ही विषयांत ९८ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.

या यशाबद्दल वाडी नगर परिषदेच्या वतीने शहराध्यक्ष नरेश चरडे आणि नगर परिषद उपाध्यक्ष कल्पना सकदेव यांच्या हस्ते स्वरित वाघमारे याचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला आनंदबाबू कदम, केशव बांद्रे, कैलास मंथापुरवार, दिनेश केचे, सरिता यादव, कमल कनोजे, संगीता बावने यांच्यासह नगर परिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Spread the love

You may have missed