
पुणे : राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले की, ‘कमवा आणि शिका’ या उपक्रमांतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना दरमहा ₹२,००० विद्यावेतन दिले जाणार आहे.
मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) येथे आयोजित कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. महिलांचे शिक्षण आणि कौशल्यविकास अधिक बळकट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला मंगल प्रभात लोडा, एनएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान, तसेच Friends Union for Energizing Lives (फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्हज) संस्थेचे संस्थापक Dr. Ketan Deshpande उपस्थित होते.
राज्य सरकार, एनएसई आणि फ्युएल (फ्रेंड्स युनियन फॉर एनर्जायझिंग लाइव्हज) यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गरजू विद्यार्थिनींसाठी शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण होतील, असेही यावेळी सांगण्यात आले. कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी ‘फ्युएल’ संस्थेला ‘राज्य कौशल्य विद्यापीठ’ म्हणून विकसित करण्याचे काम सुरू असल्याचे नमूद केले.
दरम्यान, फ्युएल संस्थेने सोशल स्टॉक एक्स्चेंज माध्यमातून सुमारे ९९ लाख रुपयांचा निधी उभारला असून, त्यात सर्वसामान्य देणगीदारांचाही मोठा सहभाग आहे. एनएसई प्लॅटफॉर्म देशातील बहुतांश शहरांपर्यंत पोहोचला असून, यामुळे नागरिकांना सामाजिक बदलात सहभागी होण्याची संधी मिळत आहे.
या योजनेमुळे विद्यार्थिनींना शिक्षणासोबत आर्थिक आधार मिळणार असून, त्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…