
पुणे, दि. 27 जून : पुणे शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक-2 ने अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत 1 किलो 790 ग्रॅम अफू जप्त केली. या कारवाईत एकूण 40 लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
26 जून 2026 रोजी अमली पदार्थ विरोधी पथक-2 चे अधिकारी आणि कर्मचारी पुणे शहरात पेट्रोलिंग करत असताना सच्चाईमाता मंदिर, दुगड शाळेजवळ, आंबेगाव (कात्रज), पुणे येथे संशयित व्यक्तीची तपासणी करण्यात आली. आरोपी देवेंद्रसिंह प्रेमसिंह शक्तावत (मूळ रा. भातसोडा गाव, जि. चित्तौडगड, राजस्थान) याच्याकडून 35 लाख 80 हजार रुपये किमतीची 1 किलो 790 ग्रॅम अफू जप्त करण्यात आली.
याशिवाय आरोपीकडून 50 हजार रुपयांचा मोबाईल फोन, 4 लाख रुपयांची हुंडाई कंपनीची चारचाकी आणि 4 हजार 200 रुपये रोख रक्कम असा एकूण 40 लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं. 289/2026 अन्वये एनडीपीएस कायदा कलम 8(क) व 17(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अमली पदार्थ विरोधी पथक-2 चे पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी केली.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…