
वडगाव निंबाळकर / बारामती: वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हायवा टिपर चोरणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी यशस्वी पर्दापाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
घटनेची पार्श्वभूमी
दिनांक २२ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०० वाजल्यापासून ते दिनांक २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजण्याच्या दरम्यान, मौजे मुढाळे (ता. बारामती, जि. पुणे) येथील माळशिखारे यांच्या हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या पंपावरून एक हायवा टिपर चोरीला गेला होता. या प्रकरणी २३ जुलै २०२६ रोजी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कसून तपासातून आरोपी जेरबंद
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते यांनी तातडीने तपास पथक नेमले. गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना तात्काळ रवाना करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर येथून टिपर आणि दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले.
तपासात खालील आरोपींनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे:
- राहुल विठ्ठल कराळे (वय ३१ वर्षे, रा. सिरेगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर)
- आदित्य रमेश कराळे (वय २५ वर्षे, रा. सिरेगाव, ता. गंगापूर, जि. संभाजीनगर)
सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार भागवत पाटील करीत आहेत.
पोलीस पथकाचे यश
सदरची धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. संदीपसिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक मा. गणेश विरादार आणि बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन मोहिते, पोलीस हवालदार भागवत पाटील, महेश पन्हाळे, पोपट नाळे, अनिल खेडकर, हृदयनाथ देवकर, पोलीस नाईक भाऊसाहेब मारकड, तसेच पोलीस शिपाई आबा जाधव, नरेंद्र यादव, सुरज धोत्रे, धनंजय भोसले आणि विकास पेटाळे यांनी सहभाग घेतला होता.

More Stories
पुणे विद्यापीठात डिग्रीचा बाजार? ३ लाखांत मिळतेय B.Com ची बनावट पदवी; रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे खळबळ…
दिल्लीतील जंतरमंतर लाठीहल्ल्याच्या निषेधात लोणी काळभोर येथे भव्य मोर्चा संपन्न; सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांचा सहभाग…
पुणे: कोंढव्यात ई-सिगारेट (वेब) विक्री करणाऱ्यावर पोलिसांची धडक कारवाई; ४५ हजारांचा माल जप्त…