July 28, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुनावळे येथील “युरोकिड्स स्कूलमध्ये “ सुरू असलेल्या SIR मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

पिंपरी चिंचवड: चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुनावळे गावचे युवा नेते तथा भाजपा, पिं.चिं.शहर, कार्यकणीचे सदस्य श्री राहुल दिलीप काटे यांच्या पुढाकाराने युरोकिड्स स्कूलमध्ये , पुनावळे येथे दिनांक २५ जुलै रोजी SIR (Special Intensive Revision) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची विशेष मोहीम आयोजित करण्यात आली.

या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पुनावळे, गायकवाड नगर, काटेवस्ती, पांढरेवस्ती , माळवाडी, कोयतीवस्ती तसेच परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या मतदार यादीतील माहिती अद्ययावत करून घेतली.

या SIR (Special Intensive Revision) मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणी यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षिका सौ. ज्योती तपकीर यांचे तसेच या मोहिमेत कार्यरत असलेल्या सर्व शिक्षकवृंदाचे विशेष सहकार्य व मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या परिश्रम, समन्वय आणि सेवाभावी वृत्तीमुळे ही मोहीम अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पडत असून, त्याबद्दल मा. राहुल दिलीप काटे यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

यावेळी मा. राहुल दिलीप काटे यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, ज्या मतदारांनी अद्याप आपली माहिती अद्ययावत केलेली नाही त्यांनी तातडीने करून घ्यावी .

या केंद्रावर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने नियुक्त करण्यात आलेले सर्व बीएलओ (Booth Level Officers) उपस्थित असून, ते प्रत्येक मतदाराला SIR प्रक्रियेत आवश्यक ती मदत व मार्गदर्शन करत आहेत.

सर्व मतदारांना पुन्हा एकदा आवाहन करण्यात येते की, आपल्या मतदानाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी मतदार यादीतील माहिती वेळेत अद्ययावत करून या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा.

– मा. श्री राहुल दिलीप काटे
(भाजपा,पिं.-चिं.शहर,जिल्हा कार्यकारणी)

Spread the love