July 29, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुणे: MPDA कायद्यांतर्गत स्थानबद्ध असलेला आरोपी मुंढवा पोलिसांच्या जाळ्यात; लपून वावरणाऱ्या पवन गायकवाडला अटक…

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तांनी पारित केलेल्या स्थानबद्धतेच्या (MPDA) आदेशातील एका पाहिजे असलेल्या आरोपीस मुंढवा पोलिसांनी धडक कारवाई करत ताब्यात घेतले आहे. पवन सचिन गायकवाड (वय २०, रा. मंदाजाधव, जांभळे प्लॉट, केशवनगर, मुंढवा, पुणे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती

​दिनांक १७ जुलै २०२६ रोजी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी आरोपीविरोधात स्थानबद्धतेचा (MPDA) आदेश पारित केला होता. आरोपी पवन गायकवाड हा मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्वतःचे अस्तित्व लपवून वावरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार चेतन गायकवाड आणि सलीम अत्तार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त झाली.

पोलिसांची तात्काळ कारवाई

​मिळालेल्या माहितीची खात्री करून पोलीस अंमलदार यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता वासनिक यांना, याबद्दलची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कविराज पाटील व अन्य अंमलदारांनी ताраंत कार्यक्षेत्रात शोध मोहीम राबवली. पोलिसांनी शिताफीने शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यास तपास पथकाच्या ताब्यात देण्यात आले.

पोलीस पथकाचे योगदान

​सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

  • मार्गदर्शन करणारे अधिकारी:
    • ​मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील
    • ​मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ६) श्री. जीवन बेनिवाल
    • ​मा. सहायक पोलीस आयुक्त (हडपसर विभाग) श्री. अतुलकुमार नवगिरे
  • कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार:
    • ​वरिष्ठ पोलीस निरीक्षक – श्रीमती स्मिता वासनिक
    • ​पोलीस निरीक्षक (गुन्हे) – श्री. सागर गोडे
    • ​सहायक पोलीस निरीक्षक – गणेश पिगुवाले
    • ​पोलीस उपनिरीक्षक – कविराज पाटील
    • ​तपास पथक अंमलदार – चेतन गायकवाड, विनोद साळुके, राहुल मोरे, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, रुपेश तोडेकर, सचिन बोराटे व सलीम अत्तार.
Spread the love