September 14, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुण्यात दहशत माजवण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत आरोपी अटकेत; पर्वती पोलिसांची धडक कारवाई…

पुणे (सुनित जैनजांगडे) : पुढील काही काळ परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने जवळ देशी पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पर्वती पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून सुमारे ४१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

​क्षितिज काळुराम मोहोळ (वय १९, रा. स.नं. २१४, मांगिरबाब चौकाजवळ, दांडेकर पूल, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

कारवाईची पार्श्वभूमी

​दि. ३० जुलै २०२६ रोजी पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक किरण पवार आणि त्यांचे पथक गस्तीवर होते. यादरम्यान पोलीस अंमलदार अमोल दबडे, अमित चिव्हे आणि स्वप्निल घुगे यांना एका सराईत गुन्हेगाराबाबत गोपनीय बातमी मिळाली.

​मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथक प्रमुख पोलीस उप-निरीक्षक किरण पवार यांनी तातडीने सापळा रचून आरोपी क्षितिज मोहोळ याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत व ताब्यातुन एकूण अंदाजे ४१,०००/- रुपये किमतीचे १ देशी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे मिळून आली.

गुन्हा दाखल

​सदर आरोपीविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलीस पथकाची कामगिरी

​सदर यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परि-०२) मिलिंद मोहिते, आणि सहायक पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांच्या सूचनांनुसार पार पडली.

​या कारवाईमध्ये पोलीस उप-निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, अमोल दबडे, अमित चिव्हे, स्वप्निल घुगे, मनोज बनसोड, राकेश सुर्वे, सुर्या जाधव आणि गणेश तरंगे यांच्या पथकाने सहभाग घेतला होता.

Spread the love

You may have missed