September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

​पुणे पोलिसांची मोठी कारवाई! गहाळ झालेले १४८ मोबाईल मूळ मालकांच्या हातात…

पुणे | सुनित जैनजांगडे

​पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हरवलेल्या वस्तू परत मिळवून देण्यासाठी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. पुणे शहरात विविध ठिकाणी गहाळ झालेल्या मोबाईलच्या प्राप्त तक्रारींच्या आधारे, CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलद्वारे ट्रेस करण्यात आलेले तब्बल १४८ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. या सर्व मोबाईलची अंदाजे किंमत ३१ लाख रुपये असून, आज दि. १०/०८/२०२६ रोजी ते अधिकृत तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले.

मोबाईल परत मिळताच नागरिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

​आपला हरवलेला किंवा गहाळ झालेला महिनान्-महिन्यांपूर्वीचा मोबाईल पुन्हा हातात पडताच अनेक तक्रारदारांना आनंदाश्रू अनावर झाले. महागड्या वस्तू परत मिळाल्यामुळे नागरिकांनी पुणे शहर पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांचे मनापासून आभार मानले आणि पुणे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे भरभरून कौतुक केले.

पोलीस प्रशासनाचे यशस्वी मार्गदर्शन आणि कारवाई

​सदर महत्त्वाची आणि उत्कृष्ट कारवाई उच्च अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेमार्फत पार पाडण्यात आली आहे:

  • मार्गदर्शन:
    • ​मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर – श्री. अमितेश कुमार
    • ​मा. पोलीस सह आयुक्त – श्री. संजय दराडे
    • ​मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) – श्रीमती तेजस्वी सातपुते
    • ​मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) – श्री. गौहर हसन
    • ​सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-०३) – श्री. शंकर खटके
  • प्रत्यक्ष कारवाई: पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, त्यांचे अधिनस्त CEIR पोर्टल हाताळणारे पोलीस अंमलदार आणि गुन्हे शाखा युनिट १ ते ७ च्या पथकाने विशेष मोहिमेअंतर्गत ही उत्कृष्ट कामगिरी फत्ते केली आहे.
Spread the love

You may have missed