September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

पुण्यात लक्ष्मीनगर पोलिसांची धडक कारवाई; घरफोडी करणाऱ्या विधीसंघर्षित बालकाला घेतले ताब्यात, ७६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत…

पुणे: लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून, तब्बल ७६ हजार ७०० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.

​गोपनीय बातमीवरून कारवाई

​लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पेट्रोलिंग व संशयित इसमांचा शोध घेतला जात होता. यादरम्यान, तपास पथकातील पोलीस अंमलदार राहुल परदेशी व किरण भागीत यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पोलिसांनी बालाजीनगर, येरवडा येथून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.

​त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने बिडी कामगार वसाहत येथील दोन वेगवेगळ्या घरांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.

​हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल व उघडकीस आलेले गुन्हे

​पोलिसांनी आरोपी बालकाकडून खालीलप्रमाणे ७६,७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे:

  • ​डेल कंपनीचा लॅपटॉप
  • ​लॅपटॉप बॅग व हेडफोन
  • ​वनप्लस कंपनीचा मोबाईल फोन
  • ​म्युझिक स्पीकर
  • ​तांब्याचा हंडा
  • ​१ ग्रॅम सोन्याचे बेनटेक्सचे गंठण

​या कारवाईमुळे लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनकडील खालील दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत:

  1. गु.र.नं. १४५/२०२६ – भा.न्या.सं. कलम ३०५ (अ), ३३१ (३)
  2. गु.र.नं. ९५/२०२६ – भा.न्या.सं. कलम ३०५

​सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मयुर सूर्यवंशी करत आहेत.

​मार्गदर्शक अधिकारी व तपास पथक

​सदर धडक कामगिरी पोलीस आयुक्तालय व परिमंडळ ०४ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परि० ०४) श्री. चिलुगुला रजनिकांत, आणि सहायक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) श्री. सुनिल जैतापुरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

​लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कदम व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलकंठ जगताप यांच्या सूचनांनुसार तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे आणि पोलीस अंमलदार यशवंत खंदारे, श्रीनाथ कांबळे, अतुल जाधव, राहुल परदेशी, भिमराव कांबळे, सुरज ओंबासे, कादिर शेख, अमोल गायकवाड, दत्तात्रय शिंदे, नितीन धायगुडे, किरण भागीत, अमोल वायाळ, अक्षय शिंदे व सचिन कुचेकर यांनी ही यशस्वी कामगिरी फत्ते केली आहे.

Spread the love

You may have missed