
पुणे / दौंड | (प्रतिनिधी: प्रीतम सावंत): यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा तस्करी विरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. दौंड तालुक्यातील खोपोडी येथील गरदडे वस्तीवर छापा टाकून पोलिसांनी ६६ वर्षीय महिलेच्या ताब्यातून तब्बल २ किलो १५० ग्रॅम वजनाचा, १ लाख ७ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कारवाईचा घटनाक्रम
दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १५:०० वाजता यवत पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ वरिष्ठांच्या परवानगीने सापळा रचला.
पोलिसांनी मौजे खोपोडी, गरदडे वस्ती (ता. दौंड, जि. पुणे) येथील आरोपी महिला कमल बबन गरदडे (वय ६६ वर्षे, रा. खोपोडी) हिच्या राहत्या घराची झडती घेतली. यावेळी ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या व अनाधिकाराने घरात गांजा बाळगून असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या ताब्यातून हिरवट काळसर रंगाचा, बिया-दोंडे व भुग्यासह असलेला २ किलो १५० ग्रॅम गांजा (किंमत १,०७,५००/- रुपये) पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आला.
गुन्हे दाखल व पुढील तपास
सदर प्रकरणी पोलीस हवालदार संदिप देवकर यांनी यवत पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली असून, आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे आणि पोलीस अंमलदार करीत आहेत.
कारवाईत सहभागी पोलीस पथक
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदिपसिंह गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापुराव दहस यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याच्या खालील पथकाने पार पाडली:
- पोलीस निरीक्षक श्री. संतोष तासगावकर
- सहा. पोलीस निरीक्षक श्री. आबा गाढवे
- पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड
- पो.हवा. संदिप देवकर, महेंद्र चांदणे, अमोल काळे, संदिप करे
- पो.कॉ. धिरज जाधव, प्रतिक जगताप, मारूती बाराते
- म.पो.कॉ. स्वप्नाली टिळवे

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…