September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

विश्रांतवाडी पोलिसांची धडक कारवाई; ४ लाख ८० हजारांच्या ६ मोटारसायकली जप्त, सराईत चोरटा जेरबंद…

Oplus_131072

पुणे: विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका सराईत वाहन चोराला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी आरोपीकडून ४,८०,०००/- रुपये किमतीच्या एकूण ६ मोटारसायकली जप्त केल्या असून, या कारवाईमुळे परिसरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.

​कारवाईचा तपशील

​विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना, पोलीस अंमलदार वामन सावंत आणि संजय बादरे यांना बातमीदाराकडून एक महत्त्वाची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित इसम ओमकार रामभवन यादव (वय २० वर्षे, रा. शांतीनगर, येरवडा, पुणे) याला ताब्यात घेतले.

​त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून पोलिसांनी खालीलप्रमाणे विविध कंपन्यांच्या गाड्या हस्तगत केल्या आहेत:

  • १) केटीएम कंपनीची ड्युक मोटारसायकल
  • २) यामाहा कंपनीची आर/१५ (R/15) मोटारसायकल
  • ३) दोन यामाहा कंपनीच्या आर.एक्स १०० (RX 100) मोटारसायकल्या
  • ४) होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल
  • ५) पॅशन प्लस मोटारसायकल

​अशा प्रकारे एकूण ४,८०,०००/- रुपये किमतीच्या ०६ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

​मार्गदर्शन व तपास पथक

​सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

  • मार्गदर्शक: मा. अपर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ४, पुणे शहर) श्री. चिलुमुला रजनिकांत, आणि मा. सहायक पोलीस आयुक्त (येरवडा विभाग) श्री. सुनिल जैतापूरकर.
  • प्रमुख अधिकारी: वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संपतराव राऊत, आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमर कदम.
  • तपास पथक: सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुनिल उगले यांच्यासह पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, संजय बादरे, वामन सावंत, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, स्वप्नील कांबळे, किशोर भुसारे, प्रमोद जाधव आणि होना साबळे यांनी सहभाग घेतला.
Spread the love

You may have missed