September 12, 2026

unfilteredtruth

unfilteredtruth

‘आठवणीतले दादा’! रांगोळीच्या माध्यमातून स्वर्गीय अजितदादा पवारांना अनोखी मानवंदना…

प्रतिनिधी : अमित मुंडीक : बारामती येथे नुकत्याच संपन्न झालेल्या चतुर्भुज कलाविश्व प्रस्तुत “आठवणीतले दादा” या विशेष रांगोळी प्रदर्शनाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित व्यक्तीचित्रे तब्बल ३० रांगोळी कलाकारांनी आपल्या कलेतून साकारली.

या प्रदर्शनासाठी कलाकारांनी सलग दोन दिवस अहोरात्र मेहनत घेत विविध रंगछटा आणि आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक जीवनातील विविध पैलू रांगोळ्यांमधून प्रभावीपणे उभे करण्यात आले होते.

या प्रदर्शनाला महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी भेट देत सर्व कलाकारांच्या कलाकृतींचे कौतुक केले. रांगोळीच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेली सर्जनशीलता आणि कलाकारांची मेहनत वाखाणण्याजोगी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

चतुर्भुज कलाविश्वच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, प्रदर्शनातील अनेक रांगोळ्या उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरल्या. कलाकारांनी आपल्या कलेद्वारे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याला अनोखी मानवंदना दिली.

Spread the love

You may have missed