
दौंड, यवत (प्रतिनिधी: प्रीतम सावंत):दौंड तालुक्यातील मौजे दापोडी येथे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एका इसमावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार विकास बाबासाहेब मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
काय घडली घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२८ जुलै २०२६) सायंकाळी १६:४५ वाजेच्या सुमारास दापोडी गावाच्या हद्दीत आरोपीच्या राहत्या घरासमोरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. संतोष महादेव मसाळ (वय ३५ वर्ष, रा. दापोडी, ता. दौंड, जि. पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये (फुगे) गावठी हातभट्टीची तयार दारू विक्री करत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
जप्त करण्यात आलेला माल:
पोलिसांनी घटनास्थळावरून रु. १,६००/- किमतीच्या एकूण ८० प्लास्टिकच्या पिशव्या (प्रत्येकी २० रुपये प्रमाणे) गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे.
गुन्ह्याची नोंद:
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस बी.एन.एस.एस. ३५(३) ची नोटीस बजावण्यात आली आहे.
या गुन्ह्याची नोंद पोलीस हवाल्दार खोमणे यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवाल्दार काळे करत आहेत.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…