
पुणे, (प्रतिनिधी: प्रीतम सावंत)३० जून : अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर सुरक्षेचे महत्त्व आणि मोबाईलचा जबाबदारीने वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना नशेच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम याविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली.
यानंतर अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. शाळेतून सुरू झालेली ही फेरी लोणी काळभोर परिसरातील प्रमुख रस्ते आणि चौकांमधून मार्गक्रमण करत पुन्हा शाळेत दाखल झाली. या फेरीत सुमारे २०० विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजीद्वारे समाजात नशामुक्तीचा संदेश पोहोचवला.
कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, पोलीस उपनिरीक्षक मुंडे, शाळेच्या प्राचार्या पौर्णिमा शेवाळे, तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी, विशेषतः युवकांनी, अंमली पदार्थांपासून दूर राहून सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन पोलिसांनी केले.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…