
लोणी काळभोर : जिल्हा क्रीडा युवक सेवा संचालनालय, पुणे, पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या अंतर्गत राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात १ ऑक्टोबर रोजी १७ व १९ वर्षांखालील मुलींच्या जिल्हास्तरीय ग्रामीण वेटलिफ्टिंग स्पर्धा पार पडल्या.
या स्पर्धेत लोणी काळभोर येथील सह्याद्री स्पोर्ट अँड फिटनेस सेंटरच्या पाच खेळाडूंनी विविध वजन गटांत सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी करत पाचही पदके पटकावली.
स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची कामगिरी पुढीलप्रमाणे आहे :
- नेत्रा भागवत थोरात – १७ वर्षांखालील ४४ किलो वजनगटात प्रथम क्रमांक
- आराध्या संदीप भोसले – १७ वर्षांखालील ५८ किलो वजनगटात प्रथम क्रमांक
- आर्या अण्णाराव गायकवाड – १७ वर्षांखालील ६३ किलो वजनगटात प्रथम क्रमांक
- तन्वी गणेश अंबिके – १७ वर्षांखालील ४४ किलो वजनगटात द्वितीय क्रमांक
- नंदिनी जालिंदर काळभोर – १७ वर्षांखालील ६३ किलो वजनगटात द्वितीय क्रमांक
याशिवाय नेत्रा भागवत थोरात हिने १७ वर्षांखालील गटातील ‘बेस्ट वेटलिफ्टर’चा किताब पटकावला. प्रथम क्रमांक मिळवलेल्या खेळाडूंची ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी पुणे येथे होणाऱ्या विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक तसेच राष्ट्रीय वेटलिफ्टिंग पंच गणेश विठ्ठल नगीने यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, या उल्लेखनीय यशाबद्दल लोणी काळभोर ग्रामस्थांसह तुषार बाळासाहेब दौंडकर, उपसंचालक (सार्वजनिक बांधकाम विभाग), अभिनव चेतना मंडळाचे अध्यक्ष हेमंत सोपानराव हाडके, महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल रामचंद्र काळभोर, सरपंच नागेश काळभोर, वि.वि.का. सोसायटीचे चेअरमन रमेश यशवंत भोसले, लोणी काळभोर शिवसेना नेते संतोष भोसले, हवेली तालुका वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष योगेश उबाळे, उपाध्यक्ष अमर गिरी, खजिनदार नरेश गिरी, सामाजिक कार्यकर्ते सुधीर काळभोर, आप्पासाहेब काळभोर आदी मान्यवरांनी खेळाडूंचा सत्कार केला. तसेच आगामी विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

More Stories
टीएमव्हीच्या लॉ कॉलेजमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न…
पिरंगुटमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी युवा सेना आक्रमक; पोलीस गस्त वाढवण्याची मागणी…
कोथरूड पोलिसांची कारवाई; सराईत आरोपी रोहिदास कांबळे एमपीडीएअंतर्गत स्थानबद्ध…