
पुण्यातील उद्योजक केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासादरम्यान त्याची मंगेतर सिया हिच्या कुटुंबाबाबत विविध चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर सियाच्या वडिलांनी लग्नासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च, आलिशान महाल आणि खासगी विमानांची व्यवस्था करण्यात आल्याच्या चर्चांना फेटाळून लावले आहे.
त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “आमच्याकडे कोट्यवधी रुपयांचा महाल बुक करण्याची किंवा पाहुण्यांसाठी विमानांची व्यवस्था करण्याची आर्थिक क्षमता नव्हती. सोशल मीडियावर आणि काही ठिकाणी फिरत असलेल्या आकडेवारीचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही.”
सियाच्या वडिलांनी पुढे सांगितले की, लग्न साध्या पद्धतीने करण्याचे नियोजन होते. या प्रकरणामुळे अनेक अफवा पसरत असून वस्तुस्थिती तपासाअंतीच स्पष्ट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा तपास पोलीसांकडून सुरू असून विविध पैलूंची चौकशी केली जात आहे. तपास पूर्ण होईपर्यंत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

More Stories
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या स्मिता नॉर्टन यांचे निधन; महिला व वंचितांच्या प्रश्नांसाठी कायम राहिल्या पुढे…
पुणे: कर्जाचा डोंगर अन् शेतातील नुकसान; MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये व्यथा उघड…
पुणे: लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एसीबीचा छापा; लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर रंगेहाथ जाळ्यात…